प्रिझम फाऊंडेशनच्या ‘लार्क’या शाळेच्या कार्यालयात 'I am special' या कवितेच्या पोस्टरने सुजाताचे लक्ष वेधून घेतले. फाऊंडेशनच्या संस्थापिका श्रीमती पद्मजा गोडबोले यांची ही कविता. काही वर्षांपूर्वी परदेशात एका दंतवैद्याच्या दवाखान्यात लावलेली एक छोटीशी चार ओळींची कविता त्यांना खूप आवडली. त्यांनी ती टिपून घेतली. त्यातल्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित त्यांनी एक इंग्रजी कविता तयार केली. पालकनीतीच्या या विशेषांकासाठी सुजातानं या कवितेचा भावानुवाद केला.