लक्ष्मीनगर मध्ये असणारी खेळघर ही जागा मुलांची आवडणारी आहे. तिथे मुलांना खेळण्यासाठी अर्थपूर्ण शिक्षण घेण्यासाठी तसेच बालपणात भर घालणारी आहे. त्यामुळे बहुसंख्य मुले गेली १६ वर्षापासून खेळघराचा लाभ घेताना दिसतात .खेळघराचा लाभ अजून जास्तीतजास्त मुलांना घेण्यासाठी खेळघरात प्रयत्न केले जातात बऱ्याच वेळा मुलाना व पालकांना देखील खेळघरात दाखल झालेल्या मुलांबद्दल चांगला बदल दिसून येतो परंतु बरीच मुले भाषेची अडचण किवा खेळघरची व्यवस्थित माहिती नसल्याने खेळघरपासून वंचित राहतात.जास्तीतजास्त मुलान्प्र्यन्त पोहोचण्यासाठी विविध गम्मत उपक्रम, सर्जनशीलतेला कल्पनाशक्तीला वाव मिळेल अशा उपक्रमांची आखणी करून गर गर गिरकी शिबीर आयोजित केले.
लक्ष्मीनगर मध्ये असणारी खेळघर ही जागा मुलांची आवडणारी आहे. तिथे मुलांना खेळण्यासाठी अर्थपूर्ण शिक्षण घेण्यासाठी तसेच बालपणात भर घालणारी आहे. त्यामुळे बहुसंख्य मुले गेली १६ वर्षापासून खेळघराचा लाभ घेताना दिसतात .खेळघराचा लाभ अजून जास्तीतजास्त मुलांना घेण्यासाठी खेळघरात प्रयत्न केले जातात बऱ्याच वेळा मुलाना व पालकांना देखील खेळघरात दाखल झालेल्या मुलांबद्दल चांगला बदल दिसून येतो परंतु बरीच मुले भाषेची अडचण किवा खेळघरची व्यवस्थित माहिती नसल्याने खेळघरपासून वंचित राहतात.
खेळघराला जेव्हा रतन टाटा ट्रस्टची आर्थिक मदत मिळायला लागली तेव्हा खेळघराचा मुख्य उद्देश झाला की मुलांची खेळघरातील संख्या वाढवणे त्याच उद्देशाच्या पूर्तीसाठी विविध गम्मत उपक्रम, सर्जनशीलतेला कल्पनाशक्तीला वाव मिळेल अशा उपक्रमांची आखणी करून गर गर गिरकी शिबीर आयोजित केले.गर गर गिरकी हे शिबीर ८ ते १३ वयोगटातील मुलांसाठी एप्रिल २५ ते २८ एप्रिल या दरम्यान सुट्ट्यांमध्ये घेण्यात आले. खेळघरातील सर्व कर्मचारी वर्ग सर्व गटातील मुलांनी गृहभेटी करून मुलांना व पालकांना शिबिराचे निरोप दिले.
पहिलादिवस :-(मुले २७) पहिल्या दिवशी आनंद संकुलमध्ये आमच्या मुलांनी चेहऱ्यावर, हातावर चित्र काढून नवीन मुलांचे स्वागत केले. त्यानंतर सोसायटीच्या हॉल मध्ये मुख्य उपक्रमास सुरुवात झाली. ती म्हणजे "गोलांची दुनिया " विविध प्रकारचे गोल कल्पनाशकतीला वाव या दृष्टीने कुठे कुठे गोल असतात. घेतलेल्या गिरकी पासून पृथ्वीगोलापर्यंत त्यांच्या कागदावर रचना करून कागदकला मुलांनी तयार केली.
दुसरा दिवस:- (मुले ३६) या दिवशी चित्र कथेच्या सहाय्याने सकस संतुलित आहाराविषयी माहिती
देण्यात आली. कथा सांगितल्यावर मुलांनी त्यावर आधारित चित्र काढली. त्यानंतर आजच्या विषयाला धरूनच सकस {पौष्टिक} सण्डवीच बनवण्याचा उपक्रम घेण्यात आला प्रत्येक मुलांनी आपल आपल सण्डवीच आपल्या पद्धतीने लावून घेऊन तयार करणे हे अपेक्षित होते.
तिसरा दिवस:-(मुले ४३)
या कार्यक्रमातील तिसरा दिवस खेळघरात घेण्याचे ठरले त्यापाठीमागचा उद्देश म्हणजे खेळघराची संकल्पना सांगणे, तेथील नियम सांगणे तसेच तिथे होणाऱ्या
कार्यक्रमाबाबत म्हणजे गणित ,भाषा , सायन्स, खेळ , वाचन या कॉर्नर मध्ये प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते दिवसाखेरीस मुलांना सकस भेळ देण्यात आली . खेळघर म्हणजे काय? याची झलक मिळावी हा मुख्य हेतू होता.हे सर्व अनुभवताना शिकताना नव शिकण्याचा आनंद
त्यांच्या तोंडावर दिसत होताच. दिवसअखेरीस मुलांना सकस भेळ देण्यात आली.
चौथा दिवस:-
या दिवसामध्ये पालकांची मिटिंग ठेवण्यात आली होती. तेव्हा पालकवर्गामध्ये आई वर्गाचा मोठा सहभाग होता तर पुरुष वर्गामध्ये ८ जणांचा सहभाग होता.या मुलांनी तयार केलेल्या क्राफ्ट वर्क चे प्रदर्शन ठेवले होते खेळघरात पाठवल्याने मुलांचा विकास होण्यास निश्चितच मदत होईल. हे पालकांनी मान्य केले आणि त्यांनी मुलांना खेळघरात नियमित पाठविण्यास तयारी दाखवली.
काय साधले ----
१. ८-१० मुले खेळघराला जोडली गेली .
२. जी मुले खेळघरातून वगळत होती ती परत खेळघराशी जोडली गेली.
३. मुलांनी औपचारिक शिक्षणातून शिकण्याचा आनंद मिळत होतो त्यामुळे ते सहभागी होण्यास उत्सुक होती.