खेळघरात एकूण १५० मुले आहेत. सोयीसाठी त्यांचे सहा गट पाडले आहेत, प्राथमिक गट,माध्यमिक गट,उच्च माध्यमिक गट,शालाबाह्य लहान मुले (पालवी), शालाबाह्य मोठ्या मुली (येल्लरू) व
युवक गट. सर्वसाधारणपणे प्रत्येक गटाला रोज २-३ तास वेळ मिळेल असे आवर्जून बघितले जाते. खेळघ्रर हे दोन ठिकाणी चालते. एक केन्द्र वस्तीत आहे त्याचे नाव 'आनन्दसन्कुल' तेथे प्रमुख्याने लहान मुलान्चे वर्ग,पालकसभा होतात. दुसरे मुख्य केन्द्र शुभदा जोशीन्च्या घराशेजारील जागेत चालते. मुलान्च्या सोयीनुसार सकाळी व दुपारी दोन्ही वेळेल वर्ग होतात.
खेळघर या संकल्पनेचा महत्त्वाचा गाभा म्हणजे खेळघर व गटचर्चा हे दोन उपक्रम
खेळघर
हा खेळघरातील सर्वात महत्त्वाचा उपक्रम या उपक्रमापासूनच खेळघराची सुरुवात झाली आणि म्हणूनच संपूर्ण प्रकल्पाचे नाव खेळघर पडले. सुमारे ३ ते ४ तासांसाठी त्या वयोगटातील सर्व मुले एकत्र येतात मुळे उत्सुकतेने पाहतील, वाचतील वा प्रश्न विचारतील, स्वतःच्या भाषेतून, कलेतून व्यक्त होतील असं वातावरण यामध्ये जाणीवपूर्वक जोपासले जाते. हातांनी कलात्मक वस्तू बनविणे, चित्र काढणे, पौष्टिक खाऊ बनविणे, सिनेमे प्रदर्शन संस्था पाहणे व त्यावर चर्चा करणे विविध क्षेत्रातल्या तज्ञांना भेटणे, संवाद साधणे यासारख्या अनेक अनौपाचारिक गोष्टींचा यात समावेश असतो. यामुळे मुलांची चौकस बुद्धी, एकाग्रता, गटात एकत्र काम करण्याची सवय, निर्भयता यासारख्या गुणांचा निश्चितपणे विकास होतो.
इथं मूले त्यांना पडणार्याय प्रश्नांवर सद्यस्थितीवर अथवा निरनिराळ्या सामाजिक प्रश्नांवर चर्चा करतात. अर्थातच यातून ताई व मुलांमधील जवळीक वाढीस लागते व मूले मोकळेपणाने त्यांचे प्रश्न मांडू शकतात. जाणिवांच्या विकासासाठी हा उपक्रम अत्यंत गरजेचा आहे.
अभ्यास वर्ग
औपचारिक शिक्षणात किमान यश मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहणे हे खेळघराचे एक ध्येय आहे. अभ्यासवर्गात आमचा भर हा शालेय पाठ्यक्रमापेक्षाही मूलभूत संकल्पना समजण्यावर असतो.
जीवन भाषा
जगताना विचार करणे, निर्णय घेणे, नवे शिकणे, बदल घडविणे अशा अनेक महत्त्वपूर्ण क्षमतांच्या विकासासाठी ‘भाषा’ हे प्रमुख साधन आहे म्हणून भाषेच्या अभ्यासाला खेळघरात प्रथमपासून महत्त्व दिले जाते. भाषा हे संवादाचे तसेच इतर विषय शिकण्यासाठीही तितकीच महत्त्वाची आहे. इथली बरीच मूले ही परराज्यातून येतात. मराठी येत नसल्यामुळे बहुसंख्या मुलांचा शिक्षणातील रस संपतो म्हणून मराठी भाषा शिक्षणावर आमचा भर असतो.
इंग्रजी
आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सद्यपरिस्थितीत थोडेफार तरी इंग्रजी येणे महत्त्वाचे आहे म्हणूनच मुलांना प्राथमिक स्वरूपाचे इंग्रजी शिक्षण खेळघरात दिले जाते.
गणित
रोज जगताना अनेकवार आपला गणिताशी सामना होतो. मूळ संकल्पना अतिशय कच्च्या राहिल्यामुळे मुलांच्या मनात गणित या विषयाबद्दल एक भीती असते. ती भीती घालविणे हे खेळघराचे एक उद्दिष्ट आहे. अंकगणित मापन हिशोब समजले तरच व्यवहारातील फसवणूक टाळली जाईल.आयुष्याचे प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा तार्किक विचारही गणितातून विकसित होतो.
विज्ञानाने मुलांचा तर्कशुद्ध विचार व प्रत्येक गोष्टीचा सर्वांगिण विचार विकसित होतो. शाळेतील विज्ञानात फक्त काही गोष्टी मुलांकडून पाठ करवून घेतल्या जातात, त्यातील अवघड भाषेमुळे वैज्ञानिक संकल्पना मुलांपर्यंत पोहोचतच नाहीत. खेळघराचा प्रामुख्याने भर हा करून पाहणे व अनुभव घेणे या गोष्टींवर आहे. सोपे दैनंदिन आयुष्याशी जोडलेले प्रयोग प्रत्यक्ष करून पाहणे, वैज्ञानिक खेळणी बनवणे, त्या अनुभवांवर बोलणे असे विज्ञान वर्गाचे स्वरूप असते.
विशेष कार्यक्रम

या अनौपचारिक वर्गांच्या जोडीला अनेक सहली, अभ्यास भेटी, प्रदर्शन, सिनेमा आयोजित केले जातात. वार्षिक स्नेहसंमेलन, दुकानजत्रा यासारखे मोठे कार्यक्रम, नागपंचमी, दिवाळी यासारख्या पारंपरिक सणांचं नव्या पद्धतीनं साजरीकरण आणि महिला दिन, वसुंधरादिन यासारखे नवीन सणही उत्साहानं साजरे होतात. ह्या उपक्रमांच्या आखणीपासून कार्यवाहीनंतरच्या चर्चेपर्यंत मुलं अतिशय उत्साहात सहभागी होतात, खूप काही शिकतात.
आरोग्य
वस्तीतील अस्वच्छता, टंचाई, वंचितता यासारख्या गोष्टींमुळे बर्यानच मुलांना आरोग्याचे प्रश्न जाणवतात. यासाठी मुलांमध्ये स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. आठवड्यातून दोनदा मुलांना पौष्टिक खाऊ दिला जातो, मुलांनी काय खावं व खाऊ नये यासाठी आम्ही मुलांशी व पालकांशी सतत संवाद करतो. मुलांची डोळे, कान तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी जरूरी वाटेल त्याप्रमाणे केली जाते. मानसिक आरोग्याचेही प्रश्नही बर्याुच प्रमाणात भेडसावतात त्यासाठी खेघळराचे कार्यकर्ते असतात.
मुलांच्या विकासात पालकांचा सहभाग व त्यांचे प्रबोधन अतिशय महत्त्वाचे आहे. यामुळेच त्यांच्याशी सतत संवाद राखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. पालक भेटी व दर आठवड्याला एका गटाची पालकसभा या संवादासाठी आयोजित केल्या जातात.