नवी खेळघरं सुरू व्हावीत म्हणून कार्यशाळेचं आयोजन : ८ ते १२ फेब्रुवारी २०१२, पुणे

आगामी प्रकार: 
खेळघर
संक्षिप्त माहिती: 

नवी खेळघरे सुरू व्हावीत म्हणून पालकनीती परिवाराच्या खेळघरातर्फे गेल्या पाच वर्षांपासून प्रशिक्षण कार्यक्रम चालतो. यातून प्रेरणा घेऊन काही व्यक्ती - संस्थांनी आपापल्या परिसरात खेळघरांसारखी अनौपचारिक शिक्षणाची कामे सुरू केली आहेत. आज महाराष्ट्रात अशा दहा खेळघरांचे काम आकार घेत आहे. त्यातील तीन गट - खेळघरे आहेत. आजूबाजूच्या दहा ते बारा वाड्या - वस्त्यांवरील मुलांबरोबर या गट - खेळघरांचे काम चालते.
या वर्षीची कार्यशाळा दि. ८ ते १२ फेब्रुवारी २०१२ या काळात पुणे येथे होणार आहे.

पर्यायी शिक्षणाच्या कामात सहभागी असणार्यार अनेक संस्था - व्यक्तींनाही या कार्यशाळांची मदत झाली आहे. व्यक्तिगतरित्या तसेच संस्थांचे कार्यकर्ते - प्रतिनिधी म्हणून आपण सहभागी होऊ शकता.
सृजनशील शिकण्याची मूलतत्त्वे प्रत्यक्ष अनुभवातून आत्मसात करण्याची ही संधी आहे.

आपल्याला कार्यशाळेसाठी मनःपूर्वक आमंत्रण !
सहभाग नोंदणी १५ जानेवारी २०१२ पर्यंत.

समन्वयक
शुभदा जोशी, ज्योती कुदळे
संपर्क - खेळघर, ०२०-२५४५७३२८/९७६३७०४९३०
कार्यशाळा शुल्क: रु. १०००/-